
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक-अवधूत शेंद्रे
वर्धा – आष्टी :- डॉ. आंबेडकर मेमोरियल कमिटी ग्रेट ब्रिटन अध्यक्षा बौद्ध विद्वान रेखा पॉल यांचे भारतातील आगमन निमित्य धम्मप्रकाश विपश्यना केंद्र, बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर थॉट्स रिसर्च सेंटर येनाडा येथे १९ मार्च रोजी शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देत सन्मान करण्यात आला यावेळी त्यांचे सोबत बौद्ध महाउपासक तथा उद्योजक देवीलाल सुमन(इंग्लंड), सौ.बक्षो सुमन(इंग्लंड) शशी रत्तू( नानकचंद रत्तू यांची सून) दिल्ली,धरमपाल बांगर (इंग्लंड) बक्सो देवी दयालाल सुमन(इंग्लंड) भदंत विनयवश लंकारा पंजाब,डॉ.आंबेडकर स्मारक समिती पंजाब येथील अध्यक्ष महेशकुमार बौद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चिंचोली येथील सचिव संदीप पाटील हजर होते सदर सत्कार समारंभाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून येनाडा येथील भदंत सत्यानंद महाथेरो यांनी काम पाहिले यावेळी प्रा. डॉ. विजयाताई मुळे (आर्वी) आधुनिक अनाथपिंड दांपत्य सिद्धार्थ शेंद्रे,सुजाता शेंद्रे, प्रा. बी. टी. उरकुडे, महादेव गडलिंग मोझरी, भाऊराव दंडाळे( समता सैनिक दल मोर्शी ) उद्योजक अनिल थुल, गोकुलदास खाकसे(तिवसा) धम्मप्रचारक सिद्धार्थ मुंद्रे आयोजक धम्मदास मुंदरखे उपस्थित होते यामंगल सोहळ्यास आर्वी, आष्टी कारंजा(घा)तिवसा,अमरावती आणि विविध ठिकाणचे बौद्ध समाजातील गणमान्य व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती लक्षणीय होती