
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –
लोहा नगर पालिकेत घरकुल लाभार्थ्यांना गेल्या सहा वर्षात अनुदानासाठी चकरा माराव्या लागत होत्या पण आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून शनिवारी (२९ मार्च) बचत गटांना १ कोटी २६ लक्ष रुपये , घरकुल लाभार्थ्यांना ८० लक्ष रुपये तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा रोखीकारणाचे २३ लक्ष रुपयांचे धनादेश आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.शहरातील नागरिकांना कामासाठी नगर परिषदेत त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असा सूचना त्यांनी केल्या
लोहा नगर परिषदेच्या वतीने तुळजाई मंगल कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विविध योजने अंतर्गत अनुदान वाटप व विविध स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी नगर परिषदेच्या प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, दता वाले, करीम शेख, सरस्वती चे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण,माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राम पाटील पवार, कार्यक्रमाचे आयोजक मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यासह मान्यवरउपस्थित होते
आमदार प्रतापराव पाटील यांनी नगर पालिकेतील बोगस गुंठेवारी प्रकरणात राज्यभरात बदनामी झाली पूर्वी घरकुलासाठी लाभार्थ्यांकडून पैसे घेतले पण प्रशासकीय काळात नगर परिषद कारभार अतिशय चांगला सुरू आहे .मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या कामाचे त्यांनीकौतुक केले प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी संगेवार यांचेही काम चांगले आहे असे सांगून वाढते शहर आहे यापुढे ज्यांना घरकुल नाही अशांचा सर्व्हे करावा व घरकुलमंजूर करावे तसेच बगीचा ,मॉर्निग ट्रक तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला तसेच कामानिमित्त नगर परिषदेमध्ये येणाऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी से त्यांनीं सर्व समक्ष सांगितले
आमदार प्रतापराव याचा हस्ते दीनदयाळ सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत ३० महिला बचत गटांना १ कोती२६ लक्ष , ५२ घरकुल लाभार्थ्यांना ८० लक्ष तर सेवानिवृत्त झालेल्या सात कर्मचाऱ्यांच्या वारसांना रजा रोखीकारणाचे२३ ,,लक्ष २३लक्ष ६४ हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले तसेच स्वच्छ भारत अंतर्गत चित्रकला, रांगोळी, वेस्ट टू बेस्ट या खुल्या व शालेय स्तरावरील स्पर्धा तसेच महिलांच्या पाककला, होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस स्मृती चिन्ह आ चिखलीकर, उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी , व मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमासाठी लोहा न.प. च्या दिनदयाळ उपाध्याय योजनेच्या प्रकल्प अधिकारी मंजुषा जाधव मॅडम, समुदाय संघटक उषाताई शिंदे मॅडम, सी.आर.पी.शिल्पा जाधव मॅडम, सी.आर.पी.सविता सातेगावे मॅडम, सी.आर.पी. स्वाती इंदुरकर मॅडम,सी.आर.पी. संध्या मानसपुरे शहर उपजिविका केंद्र,वस्तीस तर संघ सर्व सदस्य बचत गट नगर रचना अभियंता कृष्णा कटारे, उल्हास राठोड, लेखाधिकारी अजिंक्य केंद्रे, संगणक अभियंता चंद्रकांत सुतार, राजेंद्र सोनकांबळे, , पाणीपुरवठा प्रमुख वैजनाथ शेटे , कर निरीक्षक गायकवाड, सोमनाथ केंद्रे,फरीद, शंकर वाघमारे , चांदू राजकोर ,गायकवाड,गजानन दांगटे महाबळे , संतोष मोरे यासह सर्वानी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. तर आभार नंदू दाढेल यांनी मानले
अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार
—————-
लोहा नगर परिषदेच्या प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार , गेल्या चार महिन्यात प्रशासनाला शिस्त लावणारे उत्कृष्ट काम करणारे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, प्रकल्प अधिकारी मंजुषा जाधव मॅडम, समुदाय संघटक उषाताई शिंदे मॅडम, सी.आर.पी. शिल्पा जाधव मॅडम, सी.आ. पी. सविता सातेगावे मॅडम,सी.आ. पी.सविता इंदुरकर मॅडम,सी.आ.पी. संध्या मानसपुरे मॅडम ,घरकुल योजनेत परिश्रम घेणारे नगर रचना अभियंता कटारे, दिनदयाळ उपाध्याय क्रीडा स्पर्धत यश मिळविणारे निलेश चव्हाण, नंदू दाढेल यांचा आमदार प्रतापराव पाटील यांनी सत्कार केला.