
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील जवळगा परिसरातील कार्यरत असणाऱ्या विद्यावर्धिनी विद्यालयामध्ये संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान परीक्षा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेत नियमित परिपाठातून वेगवेगळ्या कथांचे त्यामध्ये कथारूप रामायण, संत कथा, महाभारत यांचे वाचन घेण्यात आले. व त्यातून मुलांना या कथांचे ज्ञान किती प्रमाणात आत्मसात झाले हे पाहण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला शाळेतील 350 मुले बसले होती.*त्यामध्ये फराह मुर्तुजा शेख व लखन राजेश कुंडके या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले* व त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला उपस्थित प्रमुख मान्यवर श्री संतोषजी कुलकर्णी (प्रांत प्रमुख) श्री जुगल किशोर शर्मा, प्रमोदजी कुलकर्णी, भगवान कुलकर्णी व विश्वनाथ विळेगावे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती होती. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान संस्थे तर्फे विद्यार्थ्यांत नैतिक मूल्य रुजावे म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाळेच्या संस्था सचिव तथा मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्री संतोष कुलकर्णी यांनी मुलांना स्वप्न मोठी असतील तर आपण मोठे होतो असे बहुमोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपप्रभा वैद्य यांनी केले संचलन आकाश जाधव यांनी केले तर आभार कैवल्या नलवाड यांनी मांनले .