
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : चंदननगर चौकातील बीआरटीमुळे वारंवार होणाऱ्या अपघात, आणि नागरिकांच्या मागणीचा सततचा पाठपुरावा दैनिक चालू वार्ताने आपल्या वृत्तपत्रात परखडपने मांडत या विषयाला वाचा फोडली होती. तसेच शिरूर तालुका मित्र परिवारचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पऱ्हाड यांनी बीआरटी काढण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकेला धारेवर धरले होते. याच अनुषंगाने शनिवारी आमदार सुनिल अण्णा टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली धोकादायक बीआरटी काढण्यासंबंधात पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादा पवार व पुणे मनपा आयुक्त श्री. राजेंद्र भोसले साहेब यांच्या सोबत बैठक पार पडली.बैठकीत माजी आमदार सुनील टिंगरे यांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर बनलेला प्रश्न आणि बीआरटी मार्गिकेत होणारे अपघात टाळण्यासाठी सोमनाथ नगर चौक ते खराडी बायपास चौक या दरम्यानची अर्धवट बीआरटी मार्गिका काढण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर पवार यांनी आयुक्तांना ही बीआरटी मार्गिका तत्काळ काढण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनी तातडीने कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. या प्रसंगी आमदार सुनिल अण्णा टिंगरे,नगरसेविका उषाताई कळमकर,नगरसेवक माऊली शिंदे,नारायणभाऊ गलांडे, मनोज दादा पाचपुते,सुरेखा ताई निकम साळुंखे, कल्याणी प-हाड, माऊली दादा कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.