
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
शासकीय विश्राम गृह नांदेड येथे भरगच्च भरलेल्या सभागृहात राष्ट्रवादी पक्ष ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. कल्याणजी आखाडे यांनीओबीसी पदाधिकारी यांना मुद्देसूद विस्तृत मार्गदर्शन करून जे कार्यकर्ते पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत नाहीत, त्यांना पदापासून वंचित सुद्धा व्हावे लागेल असा इशारा पण दिला. एका महिन्यात सदस्य नोंदनी आणि पदाधिकारी यांची संख्या वाढवावी अशी सूचना केली. मार्गदर्शन करताना पदाधिकारी एकदम शांत होऊन एकाग्र तेने ऐकताना दिसत होते. भास्करराव पाटील यांनी विस्तृत मोलाचे मार्गदर्शनाची स्तुती करून सर्वतोपरी सहकार्य राहील याची ग्वाही देऊन सर्व पदाधिकारी आणि महिला यांची उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केले.
नंतर नांदेड दक्षिण विभागात ओबीसी नेते म्हणून परिचित असलेले मा. गंगाधर भांगे यांनी, एका जाती वर कोणताही पक्ष मोठा होत नसून जिल्ह्यात ओबीसी समाज 50 टक्क्यापेक्षा जास्त असून पदाधिकारी यांना पक्ष्याच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्ती करण्यात यावी, आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर हा पक्ष चालत असल्याने समाजातील वेगवेगळ्या जातीतील कार्यकर्ते आज पक्षात प्रवेश घेत असल्याचे सांगीतलें. ओबीसी पदाधिकारी यांनी आपल्या गावात विकासाची कामे करावी त, आणि भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका महानगर पालिका यांच्या निवडणुकीत पक्ष आघाडीवर राहील यासाठी पदाधिकारी यांनी कसून मेहनत करावी त्यासाठी पक्ष केव्हा हीं मदद करण्यासाठी तयार असून अजित दादा यांचा पक्ष संपूर्ण जिल्ह्यात मजबूत करू या अशी अपेक्षा व्यक्त केली.. ओमप्रकाश पोकर्णा यांनी आपण ओबीसी पदाधिकारी यांना केव्हा हीं मदतीसाठी माझ्याकडे येण्यासाठी आवाहन केले. प्रवीण पाटील चिखलीकर यांनी पदाधिकारी यांच्या कार्याबद्दल गौरोदगार काढले, दिलीप धर्माधिकारी यांनी पण मार्गदर्शन केले. शेवटी कायक्रमचे अध्यक्ष मा. भास्कर पाटील यांनी पदाधिकारी यांना केलेल्या मार्गदर्शन संबंधी आखाडे साहेबांचं कौतुक केल आणि ओबीसी पदाधिकारी आणि विशेष तः महिला यांची उपस्थिती पाहून समाधान व्यक्त करून आम्ही ओबीसी पदाधिकारी यांना सर्वतोपारी सहकार्य करण्याचे सांगितले. सभागृहातील पदाधिकारी यांच्यात आनंदी वातावरण दिसून येत होते, देगलूर हुन सर्वात जास्त पदाधिकारी आलेले होते त्याबद्दल अध्यक्षणी विशेषत: गंगाधरजी भांगे यांच्या कार्यविषयी समाधान व्यक्त केले तसेच भोकर चे राजेश्वर देशमुख साहेब आणि महिला उपाध्यक्ष स्वरा मराठे यांच्या विषयी समाधानी असल्याचे सांगून यांचं आदर्श समोर ठेऊन कार्य करा असे इतरांना सांगितले… तत्पूर्वी महिला उपाध्यक्ष स्वरा मराठे व त्यांच्या सहकार्यांनी आखाडे साहेबांचे औक्षण केल्याने साहेब भारावून गेले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी ओबीसी पदाधिकारी भारत काकडे, मारोती शीतळे, प्रभाकर पंजेवाड, स्वरा ताई मराठे,
बच्चू यादव, तेजिंदारसिंग, यांनी विशेष मेहनत घेतली
व कार्यक्रम अफलातून यशस्वी केला…