
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनीधी –
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि जनसामान्यांचे नेते स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार जितेश अंतापूरकर आणि साहेब प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सोपान महाराज सानप यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
ता. ८ एप्रिल, २०२५ रोजी मंगळवारी राञी ९ ते११ ह.भ.प. सोपान महाराज सानप आपल्या ओघवत्या वाणीतून आणि प्रभावी विचारातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कीर्तनाला संगीत साथ देण्यासाठी संगीतअंलकार कैलास महाराज पवार, संगीतअंलकार ओमकार महाराज जगताप,भजन सम्राट माऊली महाराज भंडारे, आणि मंदग विशारद कृष्णा भोरकडे उपस्थित राहणार आहेत, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.
या पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप ता. ९ एप्रिल, २०२५ रोजी बुधवारी महाप्रसादाने होणार आहे. देगलूर-बिलोली तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन अंतापूरकर मिञ मंडळाने केले आहेत.