
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
माळशिरस प्रतिनिधी
नातेपुते : शिखर शिंगणापूर शंभू महादेव यात्रेनिमित्त राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील मौजे पिंपरी येथील उमर देवस्थान व शिखर शिंगणापूर घाट या ठिकाणी तालुका उपप्रमुख हनुमंत कर्चे यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या मोफत पाणपोई चे उद्घाटन तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले, दरम्यान प्रमुख पाव्हणे म्हणून तालुका उपप्रमुख हनुमंत कर्चे, सरपंच दादासो कर्चे,सरपंच अविनाश कर्चे,नातेपुते शहर प्रमुख पै.निखिल पलंगे उपस्थितीत होते.
याप्रंसगी हनुमंत शिंदे भाजप सरचिटणीस हनुमंत कर्चे, त्यातासाहेब कर्चे, सागर कर्चे, रवींद्र झेंडे, शंकर कर्चे, संजय कर्चे, कृष्णा कर्चे, विशाल कर्चे, सह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.