
राजकीय वर्तुळात खळबळ…
सांगली येथे माजी महापौर सुरेश पाटील यांनी 7 एप्रिल (सोमवार) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ते गेल्या वर्षभरापासून राजकारण आणि समाजकारणापासून लांबच होते. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. ते सध्या अजित पवार गटात प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय सहभागी आहेत.
साधा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्या आत्महत्याचे प्रयत्नामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. 7 एप्रिल रोजी सांगलीतील राहत्या घरात त्यांनी गळफास घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने सांगलीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. या घटनेची नोंद सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला यासंदर्भातील कारण अद्याप कळू शकलेलं नाही.