
तरीही कर्मचारी चिंतेत, कारण वाचून बसेल धक्का ?
‘तुम्ही माझ्यासाठी काम करा किंवा करु नका, पण मी दुसऱ्यासाठी काम करू देणार नाही.’ जगातील आघाडीची टेक कंपनी गुगल, आजकाल याच धोरणावर काम करत आहे. कंपनी त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना वर्षभर घरी बसून फुकट पगार देत आहे.
कंपनी या कर्मचाऱ्यांकडून कोणतेही काम करुन घेत नाही आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्याची परवानगीही देत नाही. यासाठी कंपनीने करार देखील केला आहे. कर्मचारी मोफत पगार घेत असले तरी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) बाबत इतर कंपन्यांशी वाढती स्पर्धा पाहता गुगलने हा निर्णय घेतला आहे. बिझनेस इनसाइडरच्या मते, कंपनी जवळजवळ एक वर्षापासून काहीही न केल्याबद्दल त्यांच्या काही एआय कर्मचाऱ्यांना पैसे देत आहे.
कारण फक्त एवढेच की हे कर्मचारी इतर कोणत्याही कंपनीत जॉईन होणार नाहीत आणि त्यांनी गुगलमध्येच राहिले पाहिजे. एआयबाबत ओपनएआय, मायक्रोसॉफ्टसह अनेक टेक कंपन्यांकडून गुगलला स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
यूएस फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) अशा करारावर बंदी घातली असली तरी गुगल अशा कराराचा वापर करत आहे. एफटीसीचा असा विश्वास आहे की यामुळे बाजारपेठेतील स्पर्धेवर परिणाम होतो आणि कामाचे वातावरण देखील बिघडते.
जरी गुगल त्यांच्या एआय कर्मचाऱ्यांना पगार देत असले तरी, यातील बरेच कर्मचारी असे आहेत ज्यांना या करारातून बाहेर पडायचे आहे. त्यांना असे वाटते की एआय संशोधनापासून दूर राहिल्याने त्यांची क्षमता कमी होईल, ज्यामुळे भविष्यात नुकसान होईल.
ज्या वेळी गुगल, ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या त्यांच्या एआय पायाभूत सुविधांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत, त्या वेळी हे कर्मचारी कामापासून दूर राहिल्यामुळे नवीन तंत्रज्ञान शिकू शकणार नाहीत आणि त्यांचे भविष्यात नुकसान होईल.
ज्या वेळी गुगल, ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या त्यांच्या एआय पायाभूत सुविधांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत, त्या वेळी हे कर्मचारी कामापासून दूर राहिल्यामुळे नवीन तंत्रज्ञान शिकू शकणार नाहीत आणि त्यांचे भविष्यात नुकसान होईल.