
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- महाराष्ट्र राज्य निर्मीतीचे अमृतमहोत्सवी वर्षे असून राज्यात ऐतिहासिक बहुमत महायुती सरकारला मिळाले आहे, महायुती सरकार सामान्य नागरिक, लाडक्या बहिणी यांच्या पाठीशी खंबीरपणे अभे आहे, म्हणूनच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत असुन छोटया-मोठ्या कामासाठी तालुक्याच्या कर्यालयात येणे – जाने टाळण्यासाठी प्रशासन आपल्या गावात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांच्या अडीअडचणींचे गावातच निराकरण झाले पाहिजे असे प्रतिपादन आमदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांनी केले. शिराढोण ता. कंधार येथे आयोजित शासन आपल्या गावात या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कंधार उपविभागीय
अधिकारी अरुणा संगेवार, कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, उसमाननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, जेष्ठ नेते तुकाराम वारकड गुरूजी ,
प्रभारी तहसीलदार रेखा चामनर , गटविकास अधिकारी महेश पाटील, वन अधिकारी संदीप शिंदे, नामदेव पंढरे वनरक्षक शिराढोण, तालुका कृषी अधिकारी श्री बाठोरे ,
सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे. सेवानिवृत्त अति. मुकाअ शिवाजी कपाळे, माजी सभापती बाबुअण्णा मुकावार , उपअभियंता सुमीत पाटील, कंधार तालूका आरोग्य अधिकारी दासरे ,प्रा. आरोग्य केंद्र उस्मानगर येथील वैद्यकीय अधिकारी सौ.दुलेवाड, आयोजक साईनाथ कपाळे, दत्तात्रय देवणे, बाबुराव भुरे, मुक्ताराम पांडागळे, नंदकुमार देवणे, सुर्यकांत देवणे, भगवान कपाळे यांच्यासह नागरीक परिसरातील नागरिक उपस्थित होते.
शासन आपल्या गावात या उपक्रमाचा हेतु म्हणजे गावातील सामान्य नागरीकांच्या अडीअडचणींची गावातच सोडवणुक झाली पाहिजे, शासनाच्या विविध योजना
नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे हा आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार करण्याची संधी शेतकर्यांना मिळणार आहे, यासाठी पुर्वी लोकसहभागातून ही कामे केली जायची मात्र आता यासाठी शासन अनुदान देणार आहे, पुर्वी घरकुलाचे अनुदान एक लक्ष रुपये होते आता माझ्या मागणीनुसार मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अनुदान दोन लक्ष रुपये केले आहे. अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. संजय गांधीं निराधार योजनेचे अधिकचे अर्ज पाहता ३० एप्रील रोजी शिराढोण गावातच निराधार योजनेची बैठक घेण्यात यावी, यासह पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहून धान्य मिळत नसलेल्या लाभार्थ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात यावेत, शेतकरी आत्महत्या कुटुंबाला मदत देण्यात यावी, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घरकुल देण्यात यावे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिल्या. यावेळी उस्माननगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी उपविभागीय अधिकारी अरूणा , संगेवार , उपविभागीय पोलीस अधिकारी अश्वीनी जगताप , सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांनीही आपले या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमांचे प्रस्ताविक कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन गुणाजी कपाळे यांनी केले.