
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- एकाच ठीकानाल जाण्यासाठी जसे अनेक मार्ग असतात. जसे आपण जवळचा आणि सोपा मार्ग निवडतो. तसेच परमेश्वराची भक्ती धर्मपंथाप्रमाणे वेगवेगळ्या पध्दतीने आपण करतो, परंतु सगळ्यात सोमा मार्ग देवाचे नामस्मरण हा आहे. आपण प्रभुरामाचे सतत नामस्मरण करावे असे प्रतिपादन ह.भ.प . प्रबोधन महाराज पाळेकर यांनी केले. ते उस्माननगर ( मोठीलाठ ) येथे रामजन्मोसवा निमित श्री शारदा वाचनालय चे वतीने आयोजित किर्तन प्रसंगी बोलत होते. ” राम नामा वाचोणी श्रेष्ठ नाही दुजा कोनी” या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर निरुपण करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले जिवनात कठीण प्रसंगाचा सामना साधुसंतानाही करावा लागतो . आपली भक्ती अंत:करनातुन असावी पण तसे होत नाही ? पारमार्थिक अनुभवच सगळ्यांना सांगावे . आयोध्येत राममंदिर झाले धर्म टिकण्यासाठी चे कायदे सरकार करत ही आपल्यसाठी सर्वासाठी चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. वाचनालयाचे वतीनी श्यामराव जहागिरदार गुरुजी यांनी महाराजांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील सर्व भक्तमंडळी महीला मंडळ उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.