
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख साईनाथ कर्डिले यांनी आमदार विलास भुमरे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण येथे नाथसागर धरण व संत ज्ञानेश्वर उद्यान हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पैठण शहरात अनेक महापुरुषांचे स्मारक आहेत. त्यामुळे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचेही भव्य स्मारक पंचायत समिती कार्यालय परिसरात उभारावे, अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली. यावेळी छावा महाराष्ट्र सेना प्रमुख किशोर शिरवत, सल्लागार किशोर सदावर्ते, रामेश्वर बावणे, गोकुळ पठाडे, जिजा कर्डिले आदिं उपस्थित होते.