
पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी उपचार न केल्यामुळे एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे.
या मृत्यूला रुग्णालयाच कारणीभूत असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. तर तनिषा भिसेंच्या मृत्यूला जबाबदार डॉ. सुश्रुत घैसास यांच्या राजीनाम्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. अशातच आता इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या बचावासाठी मैदानात उतरल्याचं समोर आलं आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी पंजाब पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा आरोपीला पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे. झिशान अख्तरच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. पंजाबमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे.
वारजेत गॅस सिलिंडर स्फोट, दोन जणांचा होरपळून मृत्यू
पुण्यातील वारजे येथे मध्यरात्री एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली आहे. मोहन चव्हाण आणि आतिश चव्हाण असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन
मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत असून माफी मागावी आणि मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी, अशी उत्तर भारतीय विकास सेनेकडून मागणी करण्यात आली आहे. तर भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचे की नाही याचा विचार आम्ही करू, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होत. याच मराठी अमराठीच्या वादाचा वाद सुरू असतानाच संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला आहे. याबाबत संदीप देशपांडे यांनी दादर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
रुग्णालय परिसरात कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाही
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भात पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे. रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.