दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): पाटोदा तालुक्यातील येवलवाडी (पा.) ग्रामपंचायतची निवडणुक होऊन सव्वा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. सदर ग्रामपंचायत सरपंच पद हे महिलांसाठी राखीव असुन सरपंच पदाचा कारभार त्यांचा पती हाकत असल्यामुळे आणि गावात विकास कामे होतं नसल्याने गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्य देखील समाधानी नाहीत. त्यामुळे याबाबत अविश्वास ठराव घेण्यात आला होता. शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी या बाबत पाटोदा तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान अविश्वास ठराव आणल्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन सदस्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. प्रशासनावर देखील राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न आत सुरु झाल्याच्या चर्चा असल्यामुळे आता तालुका दांडाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. पाटोदा तालुक्यातील येवलवाडीमधील ग्रामपंचायत सात सदस्यांची आहे. सव्वा दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सरपंच म्हणून नागरगोजे विजया किशोर निवडणून आल्या होत्या. ही ग्रामपंचायत महिलाला सुटली असताना याचा कारभार सरपंचपतीच हाकत होते. गावात ग्रामसभा नाही,विकास कामे होतं असताना सदस्यांना विश्वासात घेतले जात नव्हते, कामात होणाऱ्या सततच्या अनियमितता त्यामुळे याबाबत अविश्वास ठराव घेण्यात आला. यात सहा सदस्यांनी स्वाक्षरी करत कराभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर चिमाकांत नागरगोजे, रत्नमाला नागरगोजे, मधुकर नागरगोजे, उर्मिला नागरगोजे, चतुरा नागरगोजे, इंदूबाई नागरगोजे या सहा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याची सुनावणी शुक्रवारी पाटोद्याच्या तहसीलदार यांच्या समोर होणार असुन राजकीय दबावामुळे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर प्रकरणी वरील सदस्यांनी आपल्या जिवीतास धोका असल्याबाबत पोलिस्टेशन पाटोदा येथे लेखी तक्रार दिली आहे. सदर प्रकरणी सरपंचाचे पद जाते की राहते हे पाहणे महत्वाचे आहे.