दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव :
श्रीक्षेत्र देहूनगरी ही संतांची विचार भूमी जन्म भूमी आहे. संतांचे विचारांची भूमी बनवत असताना ,उद्याच्या नवीन पिढीला काही तरी दिशा मिळाली पाहिजे ,याचा आपण विचार करूनच नगर पंचायत मध्ये काम करीत असताना चौका चौकाच सुशोभीकरण झालं पाहिजे त्यामागची संकल्पना ,कल्पना काय आहे , त्या मागचा भाव ,हेतू काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे , असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देहूगाव मध्ये सांगितले.
देहूनगर पंचायत यांच्या फंडातुन आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्या प्रयत्नातुन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरणचा लोकार्पण सोहळा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सोमवार ( ता.१४ ) रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनी करण्यात आला.या प्रसंगी आमदार सुनील शेळके बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशच नव्हे तर जगा मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना ,देहूनगरीत जयंतीच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अमरत्व असणारा चौक उभा होतोय .या चौकाचे नाव आता कायम असणार आहे ,याचा देखील आपल्याला अभिमान आहे. होतोय .आपल्या कडून चांगले काम होतंय ,ते काम आपल्या कडून तुकाराम महाराज आणि पांडुरंगच करून घेत आहेत असेही आमदार सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावाने असलेल्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले.या ठिकाणी संविधनाच्या पुस्तिकेचे प्रतिकृती ,तसेच लॉन्स , विद्युत दिवे , तसेच बसण्यासाठी बाकडे , तीन फुटी उंचीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,असे नाव या प्रकारे सुशोभीकरण करण्यात आले आहे.तर याच ठिकाणी असलेल्या चोखोबा मंदिरा लगत चौथरा तयार करून ,त्यावर देव मस्यांचा संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी देव मास्याची प्रतिकृती ,त्याच बरोबर भजन ,कीर्तन या प्रसंगी संगीत साथ देणारे वाद्य जसे की पेटी ,तबला , विना , पखवाज आणि पांडुरंचा गंध यांची प्रतिकृती तयार करण्यात आली असून याचे उदघाटन आणि लोकार्पण सोहळा सोमवारी संपन्न झाला.
या प्रसंगी वृक्षदायी संस्थेचे शिवाजी महाराज मोरे , देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे , उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण , नगर अभियंता संघपाल गायकवाड ,इतर अधिकारी ,तसेच देहूनगर पंचायतीचे नगरसेवक ,योगेश परंडवाल , योगेश काळोखे ,सुधीर काळोखे , नगरसेविका ,पूनम काळोखे , पौर्णिमा परदेशी , प्रियांका मोरे ,रसिका काळोखे ,स्वीकृत नगरसेवक , अमित काळोखे , प्रदीप परंडवाल ,माजी उपसरपंच सचिन साळुंके , माजी सरपंच कांतीलाल काळोखे , बापू चव्हाण ,किरण चव्हाण , शैलेश चव्हाण तसेच देहू ग्रामपंचायतिचे आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
