
दहशतवाद्यांना मला मारू द्या ; नेटकरी म्हणाले, ‘हाच देशाला वाचवू शकतो !
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यंटकांचा मृत्यू झाला. देशभरासह जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा या कलाकरांचा निषेध व्यक्त केला आहे.
प्रत्येक जण दु:ख, राग व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले याने सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोंदींकडे बंदुकीची मागणी केली आहे. तसंच ‘मला दहशतवाद्यांना मारु द्या’ अशी विनंती सुद्धा केली आहे.
सोशल मीडियावर अभिजीत बिचुकले याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीत बिचुकले म्हणतो की, ‘जर मोदींनी मला बंदूक दिली. तर मी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना मारुन येतो. मी देशासाठी मरायला तयार आहे. माझ्या भारतीय लोकांवर हल्ला होत असेल तर मी गप्प बसणार नाही.’ असं अभिजीत बिचकुलेने व्हिडिओमध्ये म्हटलंय.
अभिजीत बिचुकलेच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रचंड कमेंट्स येताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, ‘आता देशाला फक्त बिचुकलेच वाचवू शकतात. तर दुसऱ्याने लिहलंय की, ‘पाकिस्तान आता बघ, बिचुकले येतोय…’ तर दुसऱ्या एकाने लिहलंय की, ‘आता पाकची काय खैर नाही’ अशा कमेंट्स व्हिडिओवर येताना दिसत आहेत.
अभिजीत बिचुकले बद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस मराठी 5 मध्ये तसंच ‘बिग बॉस 15’ मध्ये तो होता. त्याचबरोबर बिचकुलेने विधानसभा निवडणूक सुद्धा लढली आहे. 2024मध्ये बिचुकले अजीत पवार यांच्या विरोधात उभा होता.