
दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी – समिर शिरवडकर
राजापूर- ( दळे) :- राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळे च्या इमारती वरील छप्पर दि.२४-०४-२५ ला कोसळले.दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारत दुरुस्ती बाबत एक वर्षे आधीच ठराव पास झाला आहे.अस असताना ही आज तगायत ग्रामपंचायत सरपंच महेश करगुटकर यांनी काणाडोळा का केला? असा प्रश्न निर्माण झाला आहे,त्यात ग्रामविकास अधिकारी यांनी आपली जबाबदारी नाही असे पत्र गटविकास अधिकारी जगतात यांना दिले होते,जणू त्यांना ही परिस्थिती लक्षात आली असावी. ग्रामपंचायत साठी निधी ची तरतुद झाली आहे असे समजले, तोच निधी या मालकीच्या इमारतीला वापरुन हीच इमारत सुसज्ज करावी,अशी मागणी संपुर्ण दळे वासीय करित आहेत.
ग्रामपंचायतीचे छप्पर कोसळून चार दिवस उलटून गेले असूनही,आज तागायत दुरुस्ती नाही. गटविकास अधिकारी यांनी सांगितले होते की तात्काळ दुरुस्ती करावी परंतु आज पर्यत दुरुस्ती नाही. अश्या या उघड्या इमारती मध्ये ग्रामस्थांचे पत्रव्यवहार, दप्तर नष्ट होण्याची भीती वर्तवली जात आहे.जर अश्या प्रकारची घटना घडली तर याला जबाबदार मात्र सरपंच महेश करगुटकर असतील कारण ठराव असूनही अजून का दुरुस्ती केली गेली नाही असे ग्रामस्थांचे मत आहे.या इमारतीला बाहेरून मात्र कुलूप आहे छप्पर मात्र मोकळं अश्या परिस्थिती मध्ये ग्रामपंचायत दळे चे सर्वच दप्तर गटविकास अधिकारी राजापूर यांच्याकडे ताब्यात देण्यांत यावे अशी ही मागणी होत आहे.