
नारायण राणे यांनी केलं मोठं विधान…
राजकीय वर्तुळात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी तयार आहेत. यावर नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटलंय की, कोण एकत्र? कोणाला आवाहन केलंय? देणारे कोण, कोणाचं आहे ते दुकान? त्यांचीच माणसं.
बऱ्याच पत्रकारांनी मला हा प्रश्न केलाय. पण मला भाष्य करायचं नाही, दोन भाऊ एकत्र आम्हाला नको आहेत का? अरे या. ते राजकारणात जर सक्रिय आहेत, आता राजकारणात दोन संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? काय राहतं त्यांच्याकडे, (Maharashtra Politics) वीस झाले आमदार, पुढच्या वेळी पाच देखील नसणार. तर दुसऱ्यांकडे काहीच नाहीये. ते आमचे मित्र आहेत. त्यांचे वीस व्हावेत अन् यांचे पाच, असा टोला देखील नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे.
दरम्यान राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे या दोघांनी देखील एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. दोघांची युती झाल्यास राजकीय समीकरणं बदलणार का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. परंतु त्यांच्या एकत्र येण्याने काहीच फरक पडणार नसल्याचं नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलंय.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले की, काही लोक कोंबडीवाले म्हणून उल्लेख करतात. पण भ्रष्टाचार करण्यापेक्षा धंदा केलेला बरा. कोविडच्या काळात औषधाला पंधरा टक्के …औषधातून पैसे खाण्यापेक्षा धंदा बरा. जे खातात ते तुम्हाला माहित आहेत. लिस्टमध्ये अगदी मातोश्रीपासून त्यांची नावं आहेत. यांची चौकशी चालु आहे. कोरोना काळातील भ्रष्ट्राचारावरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला आहे.
मी 1982 ला चिकनचा व्यवसाय मुंबईत सुरू केला. त्यावेळी चांगलं दुकान अगदी व्यवस्थित होतं. त्यावेळी मला 64 हजार नेट यायचे खर्च जावून, असं देखील नारायण राणे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे हे नारायण राणे यांना नेहमीच कोंबडी चोर म्हणून डिवचतात. यावर आता नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.