
दैनिक चालु वार्ता वाघोली प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : जीवनात आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यावर संस्कार करणाऱ्या गुरुजनांना व शाळेला कधीही विसरू नका, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १९८५-८६ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ४० वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात झाला.कार्यक्रमाला ४० वर्षांपूर्वीचे शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थीनीं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक पी. के. वाणी होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा माजी विद्यार्थ्यांचा शाळेत वर्ग भरला. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गंमती जमती सांगितल्या. विद्यालयाविषयी, गुरुवर्याविषयी काही अनुभव व्यक्त केले. सुरुवातीला राष्ट्रगीत, प्रार्थना झाली. सुरवातीला मुल्य शिक्षणाचा तास झाला. प्रारंभी सरस्वतीच्या पूजन व दिपप्रज्वलन शिक्षकांच्या हस्ते झाले.कार्यक्रमात शिक्षकांचा शाल, श्रीफळ, फेटा, देऊन गौरविण्यात आले.
गेट टुगेदर आयोजित करण्यासाठी मा. उपसरपंच उत्तम कदम,संजय शेळके,चंद्रकांत मुथा,नंदकुमार भिवरे,शिवाजी घोलप,मच्छिन्द्र ओव्हाळ,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इक्बाल शेख यांनी केले.माजी मुख्याध्यापक पी के वाणी, तुकाराम गिरमकर सर, भानुदास सात्रस सर, रामचंद्र पंडित सर,विलास भोंडवे,भगवान मोरे,पर्यवेक्षक बाळासाहेब जाधव,अप्पासाहेब बेनके, शामला पंडित यांनी मनोगत व्यक्त केले.