
ऑपरेशन सिंदूरवरील राज ठाकरेंच्या भूमिकेला किरण मानेंचा शंभर टक्के पाठिंबा !
ऑपरेशन सिंदूरवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला अनेक सवाल विचारले आहेत. त्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला आहे.
जगभरातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्यावेळी मास्टरमाईंड कशा पद्धतीनं मारले याचं उदाहरणही त्यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंना पाठिंबा देणारी फेसबूक पोस्ट किरण माने यांनी केली आहे. यात ते म्हणतात, “राज ठाकरे यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. ट्विन टाॅवर्स पडले, ओसामा बिन लादेन पाकिस्तानातल्या एक घरात लपलेला शोधून मारला. कुठल्या देशातल्या निरपराध नागरिकांवर बॉम्बहल्ला केला नाही. आपल्या लष्करानंही सुरूवात छान केली आहे. आता जेव्हा पुलवामा आणि पहलगामचे नीच कृत्य करणारे नालायक अतिरेकी सापडतील आणि मारले जातील तेव्हाच आपल्या शहिदांना न्याय मिळेल.