दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी – समीर शिरवडकर
रत्नागिरी -चिपळूण :- राधा रा. लवेकर रा. खेंड, चिपळूण या तक्रार आर्जद्वारे आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छिते की, दिनांक. १३/०४/२०२५ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास केतकी खाडी किनारी मी व अन्य पत्रकार स्वाती हडकर, बंदरकर यांच्या समवेत केतकी खाडीकीनारी राजरोसपणे खुलेआमपणे सुरू असलेल्या वाळूउपश्याची माहीती चिपळूण चे मंडळ अधिकारी राजेशिर्के व सोबत असलेल्या टिमला सर्वसमोरसूरू असलेल्या वाळूउपश्याची माहीती देत असताना अचानक मी बेसावध असताना माझ्या साथादारांना वाळूमाफीयांकडून मारहाण होत असताना राजेशिर्के यांनी हेतूपुरस्कर पणे माला त्या भांडणात ढकलले. त्यानंतर दिपक कासेकर, गण्या भालेकर, साजिद सरगुरु वाळूमाफीयांनी माझा मोबाईल हातातून खेचून घेतला व माझ्या कारमध्ये जबरदस्तीने बसण्यास सांगितले मी नकार दिल्यानंतर बळाचा वापरकरत जबरदस्ती बसण्यास भाग पाडले व दोन्ही बाजूंनी दरवाजा जवळ उभे राहून मला बाहेर येन्यास मज्जाव करीत होते. हे सर्व राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनानुसार घडत असल्याचा मला दाट संशय आहे. राजशिर्के यानी प्रशासकीय मदत नाकारून मारहाण घडवून आणल्याने त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून
मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती!