
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देत पहाटे भारतीय लष्कराने पाक व्याप्त कश्मीर तसेच पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले . याचा आनंदोत्सव आज सौंदणे येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला . भारतीय लष्कराने या स्ट्राइकला ” ऑपरेशन सिंदूर ” असे नाव दिले होते . पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारत काय भूमिका घेणार कशा पद्धतीने भारत सरकार तसेच भारतीय लष्कर याचा बदला घेईल , ही उत्कंठा लागली असताना , कोणाच्याही ध्यानीमनी नसलेला मोठा नऊ ठिकाणी स्ट्राइक भारतीय लष्कराने घडवून आणलेला आहे . अवघ्या tevisv मिनिटांत या स्ट्राइकने पाकिस्तानामधील आतंकवादी अड्डे बेचिराख केले त्यात शंभर पेक्षा अधिक आतंकवादी मारले गेले यामुळें पाकिस्तान लष्कर देखील भयभीत झालेले आहे . पहलगाम येथे जे नागरिक पर्यटनासाठी गेले होते त्या नागरिकांमधील महिला सोडून पुरुषांना धर्माच्या आधारावर ठार मारण्यात आले , त्याचाच बदला ऑपरेशन सिंदूर ने घेतलेला आहे .
आज सौंदणे येथे फटाके फोडत भारत माता की जय , वंदे मातरम् , भारतीय सैनिकांचा विजय असो , अशी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे, सागरदादा वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा सोलापूर, सौंदणे ग्रामपंचायत सदस्य रमेश भानवसे , श्रीनाथ वाघमारे ,आनंद भानवसे , अमोल नामदे , तुकाराम भानवसे , अविनाश मोकाशी, मारूती भानवसे , गोरख भानवसे, विठ्ठल वाघमारे , संजय भानवसे , सुभाष भानवसे , तानाजी गोडसे , ज्ञानेश्वर भानवसे , ज्ञानेश्वर राऊत , दिगंबर बनसोडे , धनंजय भानवसे , संतोष नामदे, सयाजी राउत, सचिन भानवसे , बंडू भानवसे, विष्णू भानवसे , नागनाथ भानवसे , सौरभ भानवसे उपस्थित होते.