
सीएच्या (CA Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्या आहे.
याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने परिपत्रक जारी केले आहे. या परिक्षा ९ मे २०२५ ते १४ मे दरम्यान होणार होत्या. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने आता या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाचं परिपत्रक काय?
९ मे २०२५ ते १४ मे दरम्यान होणाऱ्या परिक्षांबाबत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियानं म्हटलं आहे की, देशातील तणावपूर्ण सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सीए फायनल, इंटरमीडिएट आणि पीक्यूसी परीक्षांचे [इंटरनॅशनल टॅक्सेशन-असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी एटी)] मे २०२५ चे उर्वरित पेपर्स ९ मे २०२५ ते १४ मे २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.
आता कधी होणार ICAI CA परीक्षा ?
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीएआयने त्यांच्या अधिकृत सूचनेत म्हटले आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही संस्थेने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाच्या नवीन अपडेटसाठी उमेदवारांनी ICAI च्या अधिकृत वेबसाइट www.icai.org वर लक्ष ठेवावे असेही सांगण्यात आले आहे.