
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील मौजे धारासुर येथील प्राचीन व ऐतिहासिक राज्य संरक्षित गुप्तेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन व जिर्णोद्धाराची कामे सध्या जोमाने सुरू असून, या कामांची पाहणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी नुकतीच केली.
पाहणी दरम्यान त्यांनी मंदिराच्या पायाभागात सुरू असलेल्या खोदकामाचा आढावा घेतला आणि काम अधिक सुरक्षित व जलदगतीने पूर्ण होण्यासाठी मंदिर लगत असलेल्या घरमालकांना दोन महिन्यांसाठी स्थलांतर करण्याचे आवाहन केले. मंदिराच्या पायाखाली सीमा भिंत उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचे खोदकाम करताना कोणताही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घालून समन्वय साधला.
यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, नितीन चारोडे, शेख साहेब, जनसुविधा केंद्राचे अधिकारी, सवानी व्हेरिटेज कंजर्वेशन कंपनीचे अभियंते व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच राजाभाऊ गवळे व गावातील दगडू दादा जाधव, बालासाहेब नेमाने, लक्ष्मण कदम, निवृत्ती कदम, ज्ञानेश्वर कदम, सर जयराम कदम, प्रताप कदम, कुलदीप जाधव, अंगद जाधव, राजेभाऊ कदम, शेषराव कदम यांच्यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.