दैनिक चालू वार्ता क्राईम रिपोर्टर पुणे-धनंजय जाधव
पुणे शहर
दिनांक 8 मे रोजी दुपारी बारा वाजता च्या सुमारास शिवअज्ञा बंगल्यासमोर कोळेवाडी रोड अर्जुन नगर जांभुळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे इर्शाद सलमनी या इसमाने त्याच्या ताब्यातील टेम्पो हा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अविचाराने व भरधाव वेगाने चालवून, नमूद ठिकाणी फिर्यादीच्या पुतण्या अल्ताफ नौशाद सलमानी वय तीन वर्ष हा खेळत असताना तो रोडवर आल्याने त्यास धडक देऊन गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे . आंबेगाव पोलीस स्टेशन 87/2025 कलम 281, 106 (1) मोटार वाहन कायदा कलम 119/177,184 नुसार एफ आय आर दाखल करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एमजी वाघमारे करत आहे