
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग लातूर ग्रामीण जिल्ह्याची भव्य आढावा बैठक लातूर शहरातील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे आमदार मा. श्री. इंद्रिसभाई नाईकवाडी साहेब यांनी भूषवले.
या बैठकीस प्रदेश कार्याध्यक्ष मोबीनभाई सिद्दिकी, प्रदेश सरचिटणीस श्री. वेंकटराव बेद्रे, श्री. मुर्तुजा खान पठाण, शहर जिल्हाध्यक्ष मा. मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस युनूस चौधरी, प्रदेश सरचिटणीस अकबर शेख, महासचिव फेरोज टिल्लू, प्रदेश सचिव शिवानंद हंगणे, उद्योग विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष ताजभाई शेख, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहर युवक जिल्हाध्यक्ष लाला सुरवसे, माजी नगरसेवक नवनाथ आल्टे, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शहराध्यक्ष जावेद बागवान आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे मुख्य आयोजन लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शफी हाशमी आणि लातूर शहर अध्यक्ष जहांगीर शेख यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. मुस्तफा इनामदार यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष रहिम खान पठाण यांनी केले.
बैठकीत जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. आगामी राजकीय दिशा, पक्ष संघटन बळकट करण्याचे धोरण, युवकांचा सहभाग वाढविणे, तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी पक्षाच्या विविध विभागांची भूमिका यावर भर देण्यात आला. मा. इंद्रिसभाई नाईकवाडी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “अल्पसंख्यांक समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाचे विचार घराघरात पोहोचवावेत.”
बैठकीत विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. जावेद बागवान, बाबुभाई रुईकर, ईलाही बागवान, जिलानी शेख, राजा बागवान, अमजद पठाण, इस्माईल मौलाना, युनूस हाशमी, शेख खुर्शिद, वाहेद खुरेशी, सलीम शेख, अखिल मोमीन, हुजूर देशमुख, युनूस तांबोळी, रऊफ थोडगे, शकिल रावणगावकर, अकबर तांबोळी, रियाज सय्यद, मुलासाब आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी सोनू हाशमी, जावेद बागवान, अकबर तांबोळी, अखिल मोमीन, सलीम शेख यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे ही आढावा बैठक अत्यत यशस्वी ठरली.