
दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी -समिर शिरवडकर.
राजापूर:- ( होळी) :- ग्रामपंचायत दळे महसूल गाव होळी मधील पाण्याचा प्रश्न न्यायालयीन दरबारी असतानाच, होळी मधील त्याच विहिरीवरील लोकांना पाणी मिळण्यासाठी शासनाचे लाखो-करोडो रुपये खर्च केलेला आज मात्र पाण्यात गेलेल्या आहे असे म्हटले तर वावग ठरणार नाही. अश्या आशयाची बातमी दैनिक चालू वार्ता ने प्रसिद्ध केली होती.सरकार ने होळी सडेवाडी न.पा. पु.साठी करोडो रुपये खर्च करून आज ती योजना बंद स्वरूपात आहे.अश्या जिल्ह्यातील अनेक विहिरी,बोअरवेल हे शासनाच्या पैसा खर्ची पडून योजना बंद आहेत.दोन दिवसांपूर्वी होळी सडेवाडी नळ पाणी योजनेचा सरकारी पैशाच्या अपव्यय बाबत भांडा फोड झाला होता,त्यावर पाणीपुरवठा विभाग राजापूर यांना चौकशीचे आदेश गटविकास अधिकारी जगताप यांनी दिल्याचे समजते.
हे सर्व प्रकरण चालु असताना,आणि दोन गटात पाणी प्रश्नाला न्यायालयीन स्थगिती असतांना होळी सडे वाडी नळ पाणी योजनेच्या साठवण टाकीची दुरुस्ती होताना दिसत आहे.याबाबतीत दैनिक चालु वार्ता ने गटविकास अधिकारी निलेश जगताप, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी पवार, ग्रामसेवक गोरक्ष शेलार, ग्रामपंचायत सदस्य विजय गोरीवले,ठेकेदार अनुप गुणिजन यांना या बाबतीत विचारणा केली असता ,कुणालाही साठवण टाकीच्या खर्चा च्या बाबतीत माहिती नसल्याचे समजते.या सर्व विषयी गटविकास अधिकारी नीलेश जगताप यानी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी पवार यांना घटनास्थळी जाऊन पहाणी करण्यासाठी सांगितलेचे समजते.दरम्यान या सर्व विषयी चौकशी होईपर्यंत दैनिक चालु वार्ता या प्रकरणी पाठपुरावा करतच राहील.