
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
इंदोरी ते सांगूंर्डी या रस्याचे काम करावे अशी मागणी सातत्याने होत होती ,या रस्त्याचे काम गेल्या वर्षीच होणार होते , परन्तु त्यावेळी निवडणुकीचा काळ होता,अशा वेळी अधिकारी देखील चालाकी करीत असतात.म्हणून नंतर आराखडा तयार केला.शिरगाव ते गहूंजे ,सांगूंर्डी ते इंदोरी ,आणि कुसगाव या रस्त्यासाठी चाळीस ते पन्नास कोटींचा निधी मंजूर केला ,याच निधीतून इंदोरी ते सांगूंर्डी या अडीच किलो मिटर अंदाजे ६ कोटी २९ लाख रुपये निधीतून या अडीच किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणं करण्याचे काम सुरू करण्यात आले असून रविवार ( ता.११) रोजी या रस्त्याचे कामाचा शुभारंभ व लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्या आले त्यावेळी ते बोलत होते.
शिरगाव ते गहूंजे ,आणि इंदोरी ते सांगूंर्डी आणि कुसगाव या रस्त्याच्या कामासाठी आमदार सुनील शेळके यांनी चाळीस ते पन्नास कोटींचा निधी मंजूर केला असून ,इंदोरी ते सांगूंर्डी या रस्त्यासाठी सहा साडे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ,या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभ रविवार ( ता.११ ) रोजी संपन्न झाला.
यावेळी ते म्हणाले की या कामाच्या बाबतीत पीएमआरडीच्या सदस्यांनीच हरकत घेतली. ठेकेदार काय माझा पाहुणा नाही ,,कमिशन चा आणि धंद्याचा काही विषय नाही , तो सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.पुढच्या वीस ते पंचवीस वर्षांचा विचार करून हे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम झाले पाहिजे एवडीच माफक इछा असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या भाषणात सांगितले
सांगूंर्डी ते इंदोरी या रस्त्याचे अडीच किलोमीटर अंतर असून या रस्त्याचे काँक्रीटी करणं करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी ६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर करून या कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला.या रस्त्याच्या कामास ६ महिने मुदत देण्यात आली असून ,कोणत्याही ठेकेदाराला पाठीशी घातले जाणार नाही ,असाही इशारा यावेळी आमदार शेळके यांनी ठेकेदार ,संबधित अधिकारी यांना दिला असून सांगूंर्डी गावचे सरपंच ,उपसरपंच ,सद्स्य यांनाही दिला असून स्वतः जातीने लक्ष घालून काम करावे असेही शेळके यावेळी बोलले.
यावेळी माजी सभापती विठ्ठल शिंदे ,सांगूंर्डी गावचे व पीएमारडीचे सदस्य ,वसंत भसे ,प्रकाश हगवणे ,शशिकांत शिंदे ,दिलीप ढोरे ,उमेश बोडके ,शैलेश चव्हाण ,सरपंच संगीता भसे ,मयूर शिवशरण तसेच सांगूंर्डी गावचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.