
गोपीचंद पडळकरांच्या विधानाने नवा वाद !
हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन असे सध्या चालू आहे. मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत. त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली बाटवत आहेत, असं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
ते बुधवारी (दि. १४) नाशिकच्या सिडको परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
तसेच सरकारला विनंती करत म्हणाले, राज्यातील सगळ्या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत. तसेच प्रत्येक गावात धर्म दल स्थापन करण्याची गरज आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन
पुढे बोलताना म्हणाले, शाळा कॉलेजमध्ये मुली काय करतात याकडे लक्ष द्या. हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन असं सध्या सुरु आहे. मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत. त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली बाटवत आहेत. काश्मिरची परिस्थिती काय? आज पर्यटक तिथे जात आहे त्यांना धर्म विचारुन गोळ्या घातल्या जातात, असं पडळकर म्हणाले.
ज्याच्या डोक्यावर टिळा त्याच्याकडे खरेदी करा
भारतातील तथाकथित सेक्युलर यांनी गोळ्या घालणाऱ्यांना धर्म विचारला पाहिजे. हा मोदींचा भारत आहे, पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठोकले. औरंगजब कबरीचा विषय आला की महत्वाचा नाही, असं म्हणतात. आता आर्थिक कोंडी कारवाई लागेल ज्याच्यावर डोक्यावर टिळा त्याच्याकडे खरेदी करा. हलाल काय आहे? त्याचा सगळा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरु
गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरु आहे. लव्ह जिहाद सुरु आहे, या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट का पाहता? लँड जिहाद किती झाले मोकळी जागा बघितली की बांधा मशीद. त्यांच्याकडे मिलिटरी आणि रेल्वे पेक्षा यांच्याकडे जास्त जागा आहे. हे वक्फ बोर्ड आले कुठून औरग्यांच्या काळात नव्हतं.
कायदा लागू करण्याची का वेळ आली? राम मंदिर बांधल्यापासून सरकाराला महसूल मिळाला. 130 मोक्याच्या जागा लोकसभा लागण्याअगोदर देऊन टाकल्या, इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या, ही सरकारची मालमत्ता दिली. विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.