
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
अनाथाचा नाथ जन्मला
वैद्यनाथाच्या नाथरा भूमीवर
लिंबाई पांडुरंगा पोटी जन्मले
गोपीनाथ बहुजन वीर….
साधी राहणी उच्चविचारी
राजेशाही वागणे रुबाबात
दैवत बहुजनांचे शोभून दिसते
मराठवाड्याच्या भूमीवर….
भूमिगत राहून आणीबाणीत
ज्योत पेटवली स्वंयसेवकाची
जनसंघाची विचारधारा
रुजवली खेड्यापाड्यावर….
लढा उभारून संघर्षाचा
बहुजनाचा झाला नेता
समाजकारणाचा वसा घेऊनी
खेडोपाडी फिरलात महाराष्ट्रभर….
खांद्यावर घेऊनी विकासाची धुरा
झालात रयतेचा कल्याणकारी राजा
बहुजनाचे पांग फेडले
गाजवून अधिराज्य जनमानसावर….
उपेक्षित वंचित अन् बहुजणांनी
तुमचे हृदयात कोरले घर
याच मातीचा विकास साधला
तुम्ही झाले जनाचे शिल्पकार….
तुमचे वैभव पाहून थबकले
आकाशातील चंद्रसूर्य तारे
याच भूमीवर जन्माला यावे
होईल आमच्यावर उपकार….
✍️ भागी ✍️
भास्कर अर्जूनराव गिते
कंधारकर
९८६०८६३६८४