दैनिक चालू वार्ता
हडपसर /प्रतिनिधी
पुणे : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील आदर्श नगर, सेवन हिल्स सोसायटी परिसरात नव्याने सुरू झालेल्या ताज काश्मिरी चहा अॅण्ड ड्रायफ्रूट या हॉटेलचे उद्घाटन श्री. डि. एस. लोखंडे पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी श्री सुनील नेवसे, श्री अनिल मुगले, श्री तेजस सोनार, सुलतान सय्यद, तय्यब, श्री एस. डी. बारगीर, शफिक, सुलतान सैयद, सोनार, सरताज यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सदर हॉटेलचे मालक ताज इद्रीस असून, येथे अस्सल काश्मिरी चहा तसेच उच्च दर्जाचे ड्रायफ्रूट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिसरातील चहा प्रेमींसाठी हे हॉटेल विशेष आकर्षण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा व स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
पत्ता : आदर्श नगर, सेवन हिल्स सोसायटी, उरुळी देवाची, तालुका हवेली, जिल्हा पुणे – ४१२३०८.
