
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी -मनोजकुमार गुरव
========================== उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे येथे आज दिनांक २६.०६.२०२५ वार गुरुवार रोजी विधवा पुनर्विवाह कायदेशीर करणारे, बालविवाह प्रतिबंद कायदा, मागासवर्गीयांना शासकीय नोकरीत ५०% आरक्षण देणारे, आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारे, जातीभेद निर्मुलन करणारे, कोल्हापूर संस्थानाचे अधिपती लोकराजा’ महान समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार सर प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके संस्थेचे संचालक शंकर हुळमजगे आनंदराज बिराजदार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले कुमारी ज्योती जाधव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाबद्दल मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शक म्हणून अविनाश दुनगे यांनी शाहू महाराजांबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्कृती विभाग प्रमुख गोपाळ गेडाम यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक महेश खंडाळकर व्यंकट बिराजदार प्रवीण स्वामी चंद्रकांत बिराजदार सौरभ उटगे गोविंद मेडेबणे कोमल कीर्तने पार्वती जगताप कालिंदी भाले गणेश जोजन अप्पू मुदकण्णा सुप्रिया झिंगाडे सुवर्ण कलशेट्टी राजेंद्र जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.