
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी – मनोजकुमार गुरव
मनोजकुमार गुरव आज गुरुवार दिनांक 26जून 2025रोजी लाल बहादुर शास्त्री विद्यालय बेळंब येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त प्रतिमापूजन मा. मुख्याध्यापक श्री आसबे एस टी यांनी केले. त्यानंतर संविधान वाचन श्री कळपे पी जी सर यांनी केले. संविधानाचे महत्त्व, उद्दिष्टे श्री नारायणकर जे एम यांनी केले. मुख्याध्यापक श्री आसबे एस टी यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्र व कार्य विषद केले व संविधानातील कर्तव्य, हक्क व अधिकार याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव टी एन यांनी केले. तर आभाप्रदर्शन श्री नदाफ बी एल यांनी केले.