
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी -मनोजकुमार गुरव
भारत विद्यालय उमरगा येथे शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 मध्ये 95 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे संचालक तथा सहचिटणीस डॉ.सुभाष वाघमोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष शालेय समिती सुनील माने हे उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव उपमुख्याध्यापक विक्रांत मोरे परिवेक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथमतः कै.तात्यारावजी मोरे आबा यांच्या पुतळ्याचे पूजन डॉ. वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाले
तदनंतर कोण गौरव कार्यक्रम सुरू झाला त्यामध्ये
प्रशालीतून तथा महाराष्ट्र राज्यातून प्रथम डांगे श्रेया सचिन 100%, देशमुख अभय धनराज 100%, शिंदे सुमित प्रवीण 100%, जाधव देवकी परमेश्वर 99.80 टक्के, बोकडे वैष्णवी कृष्णाजी 99 टक्के, गायकवाड आकांक्षा विकास 98.40 टक्के, जांभळे आर्या संतोष 98.40 टक्के, ब्याळे समीक्षा संतोष 98 टक्के, जाधव श्वेता शिवाजी 97.80 टक्के, सूर्यवंशी सौरभी युवराज 97.60 टक्के, बिराजदार सुवर्णदीप प्रभाकर 97.40 टक्के दलाल रागिनी ईश्वर 97.40 टक्के, डिग्गे समर्थ हंसराज 97.40 टक्के, जमादार संजना रमेश 97 टक्के, ठेंगल ऋतुजा बाबाराव 97 टक्के, गुंड मधुरा सूर्यवर्धन 96.40टक्के, जंगाले क्रांती शिवराम 96 टक्के, बलसुरे प्रणिता प्रकाश 95.60 टक्के,
बलसुरे विश्वजीत प्रवीण 95 टक्के इ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यामध्ये संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण घेणारे 30 विद्यार्थी गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण घेणारे 4 विद्यार्थी मराठी विषयांमध्ये शंभर पैकी 98 गुण घेणारे दोन विद्यार्थी इतिहास भूगोल विषयात 97 गुण घेणारे तीन विद्यार्थी इ या निकालाची वैशिष्ट्य होती.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी सहशिक्षक व्यंकट गुंजोटे यांची माकणी येथे प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल
त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन दुधाराम क्षीरसागर यांनी केले व आभार संजय माने यांनी मानले.