
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी -प्रा विजय गेंड
अर्धनारी नटेश्वराच्या पावन भूमीत वेळापूर येथे पालखी मैदान येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी असते. गुरुवार दि 26 जून रोजी त्या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथ, दंगा नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, अग्निशामक दल, दंगा नियंत्रण पथक आदी यंत्रणा कार्यान्वित करून सदर ठिकाणी प्रात्यक्षिक घेण्यात आले
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम माळशिरस नंतर वेळापूर या ठिकाणी असतो. लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांसह भाविक या ठिकाणी मुक्कामी असतात.
आषाढी वारी 2025 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस जवानांना या प्रात्यक्षिकाचा अनुभव असावा यासाठी त्यांचा सराव व्हावा म्हणून पालखीतळ वेळापूर येथे गुरुवारी दुपारी मॉक ड्रिल घेण्यात आले वारी काळात भाविकांच्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध यंत्रणा किती सज्ज आहेत याची तपासणी करून सराव घेण्यात आला.