
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी- नागेश पवार
————–
दिवा – भाजप सरकारच्या ‘हिंदी शक्ती’च्या वाढत्या दबावाला उत्तर देण्यासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र येत येत्या ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, मुंबई येथे एक विराट मोर्चा आयोजित केला आहे.
या ऐतिहासिक मोर्चाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नाही.हा मोर्चा केवळ आणि केवळ आपल्या मायबोली मराठीसाठी, आपल्या मातीतल्या माणसासाठी, आणि आपल्या महाराष्ट्रासाठी असणार आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिवा शहरात बॅनर झळकावून मराठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले.
“ही वेळ आहे एकत्र येण्याची… मायमराठीच्या रक्षणासाठी आणि ठाकरे बंधूंना एकत्र उभं करण्यासाठी पाच तारखेला मुंबईत ठाण मांडूया!” असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
मोर्चा ही फक्त चळवळ नाही, ती आपली ओळख, आपली भाषा, आपली संस्कृती, आणि आपली एकजूट पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध करण्याची वेळ आहे.
५ जुलै, मुंबईत मराठी माणसाचा एकतेचा आवाज आसमंत दुमदुमवेल! असे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे