
छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात शुक्रवारी रात्री महिला किर्तनकाराची आश्रमात घुसून हत्या करण्यात आली.
या घटनेनं आता छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येत मृत पावलेल्या महिलेचं नाव ह.भ.प संगीताताई पवार असे नाव आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी लक्ष घातलं असून पोलीस या हत्येचा पुढील तपास करत आहे. ही घटना 27 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
थोडक्यात प्रकरण घ्या जाणून
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून तपास सुरु केला. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हत्या कोणी केली? हत्येमागचं नेमकं कारण काय असावं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, बोलताना उपविभाग पोलीस अधिकारी फुंदे यांनी म्हटलं की, चिंचडगाव एका रस्त्याच्या कडेला देवीचं मंदिर होतं. याच ठिकाणी संगीता पवार राहत होती. रात्री झोपण्याच्या वेळी त्या एकट्याच घरी झोपल्या असताना, अज्ञातांनी गैरफायदा घेत दगडाने ठेचून मारत हत्या केली.
दरम्यान, मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तपासाच्या दृष्टीने वेगवेगळे पथक घटनास्थळी दाखल करण्यात आलं. अशातच मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रग्णालयात पाठवण्यात आले. आम्ही गुन्हेगाराला पैसे देवू खऱ्या गुन्हेगाराला लवकरच अटक करू असं.