दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील ग्राम महसूल अधिकारी संतोष अस्कुलकर हे मागील पाच वर्षापासून जोमेगाव सज्जा मध्ये कार्यरत होते,संतोष अस्कुलकर हे अत्यंत मनमोकळे स्वभावाचे होते त्यांनी सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास न देता त्यांची कामे वेळेत पूर्ण केली, विद्यार्थी, शेतकरी, विधवा, पारितक्त्या महिलांसाठी अनेक वेळा मेळावे घेऊन त्यांनी शासकिय योजनाचा गरजुना लाभ मिळवून दिला असल्याने ते सर्व जनतेला आपलेसे वाटत होते, त्यांची बदली ही नांदेड तहसील मध्ये झाली असल्याने त्यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक २९ जुन रोजी लोहा तालुक्यातील जोमेगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला .
यावेळी त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून ग्रामस्थांच्या वतीने ,त्यांचा शाल, श्रीफळ, तसेच जोड आहेर व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, ग्राम महसूल अधिकारी स्वाती येडे,सरपंच प्रतिनिधी नागोराव शिंदे, माजी सरपंच आदिनाथ शिंदे, माजी सरपंच कोंडिबा गव्हाणे, माजी चेरमन सुधाकर शिंदे,ग्रामपंचायत सदस्य पंडित कापसे, पोलिस पाटील मारोती पांचाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोती शिंदे, रोजगार सेवक मनोहर भुरे,बालाजी पाटील,हरी पांचाळ, चंद्रकात शिंदे, शिवा माळेगावे आदींची उपस्थिती होती. यावेळी नव्याने रुजू झालेल्या ग्राम महसूल अधिकारी स्वाती येडे, विठ्ठल ढेपे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पाटील मारोती पांचाळ यांनी केले. शेवटी ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना संतोष अस्कुलकर यांनी गावातील नागरिकांचे आभार मानले.
