
दैनिक चालु वार्ता वाघोली प्रतिनीधी – आलोक आगे
दि. २५ जून ते १ जुलै या कालावधीत आनंदवाडी, ता.रेणापूर जि.लातूर येथे कृषि विभागामार्फत पोकरा टप्पा-२ चे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुक्ष्मनियोजनाचे आयोजन करुन हवामान अनुकुल आराखडा करण्यासंदर्भात प्रक्रियेचा पहिला दिवस पूर्ण करण्यात आला. त्यानिमित्त हवामान अनुकुल लक्ष्यगट चर्चा व प्रभात फेरीचे आयोजन उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय लातूर व कृषि महाविद्यालय लातूर येथील ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम चे कृषिदूत व कृषिकन्या यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवाडी ता.रेणापूर जि.लातूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवाजी कदम यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगीतली. पोकरा टप्पा -२ च्या चर्चासत्रात एस.जी.वाघमारे यांनी गावची अनुकूलता, पर्जन्यमान, निसर्गाला हानी न पोहचवता शेती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच शेतक-यांसोबत चर्चा करुन गावामधील पाण्याचा साठा, गावामधील शेतक-यांच्या गरजा, तसेच गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. चर्चासत्रानंतर कृषि महाविद्यालय लातूरचे कृषिदूत व कृषिकन्या यांच्या सहाय्याने डॉ.ज्योती देशमुख व डॉ.दयानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी येथील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी गावामध्ये काढण्यात आली. शेवटी गावातील शेतक-यांच्या मदतीने हनुमान मंदिरात कृषि विभागाचे अधिकारी, कृषिदूत व कृषिकन्या यांनी गावाचा नकाशा काढला.
या कार्यक्रमास गावचे सरपंच परमेश्वर दंडे, गावातील शेतकरी कमलाकर बांडे, शिवदास टमके, व्यंकट बांडे, रामदास टमके, विलास टमके, हरिका बांडे, दत्तात्रय सुडे, हणमंत दंडे, अनिल दंडे, जगन्नथ कलुटे व कृषिदूत आणि कृषिकन्या उपस्थित होते.