
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): वनमंञी गणेश नाईक यांनी पुणे येथे झालेल्या ‘लोकसहभागातुन वन संवर्धन आणि पर्यावरण पुरक उपजीविका’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी बोलतांना वनविभागच राज्य सरकारला पैसे देवु शकेल असा विश्वास दाखवला होता? परंतु वनविभागातील भ्रष्ट अधिकारी अन् कर्मचारी यांच्यामुळे वनमंञी गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. बीड वनविभागा अंतर्गत आष्टी वनपरिक्षेञातील आष्टी-आहिल्यानगर रस्त्याच्या रुंदीकरण कामात अडथळा करणारे रस्त्याच्या दोन्ही बाजुचे झाडे तोडण्यासाठी झाडांचे मुल्यांकण करुन तोडपरवाना देणे कामी मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार झाला असल्याची माहिती सुञांकडुन मिळाली. तोडपरवाणा मिळालेले झाडे तोडल्यानंतर वाहतुकपास घेणे बंधनकारक असतांना विनापरवाना वाहतुक करण्यात येत आहे. तोडण्यात आलेल्या झाडांचा तुकडा पंचनामा केलेला नसुन बेकायदेशीर रित्या लाकडांची वाहतुक होत असुन याकडे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. आष्टी ते नगर रस्त्यावरील झाडांच्या मुल्यांकनात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने शासनाच्या तिजोरीत जाणार्या लाखो रुपयांना बगलफाटा दिल्याने शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थीक नुकसान होत आहे. वनविभागातील अधिकारी, कर्मचारीच असे गैरप्रकार करत असतील तर वनविभाग राज्य सरकारला पैसे पुरवणार कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुल्यांकण प्रकरणात झाडांचे मुल्य जाणीवपुर्वक कमी करणे तसेच काही झाडे मुल्यांन यादीतुन वगळणे किंवा जाणीवपुर्वक झाडांचे मोजमाप कमी नोंदवणे अशा प्रकारचा गैरप्रकार करुन ठेकेदार यांचा आर्थिक फायदा करुन देण्यात येत असल्याने यातुन शासनाची मोठी आर्थीक नुकसान होत आहे. सदर प्रकरणी झाडांचे पुन:श्च पारदर्शक मोजमाप होणे गरजेचे असुन शासनाची होणारी लाखो रुपयांची आर्थिक नुकसान टाळणे गरजेचे आहे.
“आधी वनविभागातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्यांना आवरा, मग राज्य सरकारला पैसे पुरवा”
वन मंञी गणेश नाईक यांनी वनविभाग आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करुन वनविभागच सरकाला पैसे पुरवेल असे मोठ्या विश्वासाने वक्तव्य केले आहे. त्यांचा विश्वासात देखील सत्यता आहे. वनविभागाकडे आर्थिक सक्षमीकरणाची मजबुत बाजु आहे. परंतु “कुंपनच शेत खातय” या उक्तीप्रमाणे वनविभागातील अधिकारी, कर्मचारी भ्रष्ट असतील तर मंञी गणेश नाईक यांनी केलेले वक्तव्य सत्यात येणे कठीण आहे. म्हणुन “आधी वनविभागातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आवरा, मग राज्य सरकारला पैसे पुरवा” असे म्हणण्याची वेळ येत आहे.
वनविभागातील निकृष्ठ दर्जाच्या कामाचा दर्जा कधी सुधारणार?
बीड वनविभागा अंतर्गत आष्टी पाटोदा शिरुर विधानसभा मतदार संघातील वनक्षेञातील कामे निकृष्ठ दर्जाचे होत असुन वनअधिकारी, कर्मचारी संगनमताने कामात गैरप्रकार करुन लाखोंचा निधी घशात घालण्याचे काम करत आहेत. यामध्ये वरीष्ठ कार्यालयापर्यंत हात मिळवणी करुन तसेच स्थानीक राजकीय पाठबळाच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर आर्थीक गैरप्रकार होत आहे. सर्वसामान्य नागरीकांनी तक्रारी देवुन सुद्धा कुठलीच कार्यवाही होत नसल्याने वनक्षेञावरील विविध कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे वनमंञी मा. गणेश नाईक यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.