दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
जालना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन 2025 -26 या वर्षात जिल्हा परिषदेस 12 कोटी निधी मंजुर झाला असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती/ नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार तसेच अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.