दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
जालना
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डि. बी.टी. पोर्टलद्वारे शासनाकडून येत्या दोन ते तीन दिवसात खालीलप्रमाणे तालुकानिहाय निधी वितरीत होणार आहे.
यामध्ये परतुर तालुक्यातिल 213 शेतकऱ्यांसाठी 27 लक्ष 45 हजार 99 रुपये निधी वितरीत होणार आहे. मंठा तालुक्यातील 570 शेतकऱ्यांसाठी 67 लक्ष 25 हजार 789 रुपये, जालना तालुक्यातील 347 शेतकऱ्यांसाठी 30 लक्ष 79 हजार 392 रुपये, जाफ्राबाद तालुक्यातिल 512 शेतकऱ्यांसाठी 53 लक्ष 90 हजार, घनसावंगी तालुक्यातील 1 हजार 717 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 54 लक्ष 5 हजार 90 रुपये, भोकरदन तालुक्यातील 131 शेतकऱ्यांसाठी 21 लक्ष 10 हजार 671 रुपये, बदनापुर तालुक्यातील 55 शेतकऱ्यांसाठी 8 लक्ष 41 हजार 874 रुपये, अंबड तालुक्यातील 5 हजार 732 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 28 लक्ष 1 हजार 146 रुपये असे एकुण जिल्ह्यासाठी 9 हजार 277 शेतकऱ्यांसाठी 15 कोटी 90 लक्ष 99 हजार 88 रुपये इतका निधी वितरीत होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.