
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : राज्याचे कर्तबगार व दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री व लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“आ. संजय बनसोडे हे विकासाभिमुख, कार्यक्षम व जनतेच्या हितासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, अशा नेतृत्वाला माझा नेहमीच पाठींबा राहील.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बनसोडे यांच्या रस्ते विकास, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य व शेतकरी कल्याण क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले.
“संजय बनसोडे यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, ते जनतेच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक निस्वार्थ संघर्ष आहे,” असेही फडणवीस यांनी नमूद केले.
या शुभेच्छा व प्रशंसात्मक संदेशामुळे उदगीर मतदारसंघातील कार्यकर्ते व जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला हा पाठिंबा आमदार संजय बनसोडे यांच्या जनतेशी असलेल्या बांधिलकीचा आणि त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा सकारात्मक परिपाक मानला जात आहे.
या शुभेच्छांमुळे आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
—