
महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे. मराठी शिकावीच लागणार आहे. त्याचबरोबर आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. देशातील प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषाला विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रवींद्र चव्हाण यांची भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर मराठीच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे टीका केली. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईचा चेहरा बदलून दाखवला. पण तुम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम केल्याची टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता केलीय.