
रामदास कदम यांचा गौप्यस्फोट !
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. रामदास कदम यांनी ‘राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण मी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना थांबवलं.’ असं खळबळजनक विधान केलं आहे.
रामदास कदम यांच्या या विधानावर मनसेच्या नेत्यांनी अजून कोणतीही प्रतिक्रया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.
उद्या (5 जून) ठाकरे बंधू आझाद मैदानावर हिंदी भाषा सक्तीबाबतचा विजयी मोर्चा काढणार आहेत. यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले की, ‘उद्धव ठाकरे कसला मराठीचा मुद्दा हातात घेत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी दिला. त्यांनी आमचा सन्मान राखला. पण ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पहिली पासून हिंदी शिकवण्याचा निर्णय स्वीकारला. ते उद्याच्या मोर्चाला कसे असू शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट असते. पण उद्धव ठाकरे हे राक्षसी महत्वकांक्षी आहे. अशी जहरी टीका त्यांनी केली. पुढे त्यांनी म्हंटले की, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी राज ठाकरे कंटाळून देश सोडून निघाले होते. पण आम्ही त्यांना थांबवले.’ असा गौप्यस्पोट केला.