दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—–
वर्धा – आष्टी :- शहराच्या टी पॉइंट वरील साई रेस्टॉरंट मध्ये संशयास्पद अवस्थेत इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे मृतक इसम नजिकच्या ग्रामपंचायत पेठ – अहेमदपूर येथील रहिवासी असून त्याचे नाव शरद गवळी वय(४५)आहे सदर रेस्टॉरंट मध्ये मृतक हा कामगार म्हणून अनेक दिवसापासून काम करत होता असे समजते ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सदर प्रकरणात आष्टी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे यापुढील कारवाई आष्टी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे