
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
तालुक्यात सिंचनाचा अभाव असल्यामुळे तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ असे नैसर्गिक अरिष्टे शेतकऱ्यावर सतत येतात गतवर्षी अतिवृष्टीने पिकाची दाणादाण उडाली उत्पन्नात घट त्यात मालाचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. यावर्षी शेतकरी सर्व अडीअडचणी विसरून जोमाने खरिपाची पेरणी केली असता तालुक्यातील
किर्ला येथील शेतकरी रंजीत नारायण खंदारे गट न ४,४३व ,४५शेतात ३.०० हेक्टरमध्ये यशोदा सीडचे ११३५सोयाबीन वानाची ८ बॅग सदगुरु कृषी सेवा केंद्र तळणी यांच्याकडून खरेदी केल्या होत्या ज्यांचा बॅच नंबर 6571 या 8 बॅग पेरणी केल्या परतू ८ बॅग बोगस निघाल्यामुळे उगवल्या नाही त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली माझी आर्थिक हानी झाली त्यामुळे सदरील कंपनीशी व विक्रेत्याशी संपर्क केला असता दोघेही मला प्रतिसाद देत नसून दोघांनी वर हात केले आहे संबंधित कंपनीची चौकशी करून मला माझी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खंदारे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदणाद्वारे केली आहे
🎆तक्रार निवारण समिती जाय मोक्यावर जाऊन पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल
शिवदास तोटरे
कृषी अधिकारी गुण नियंत्रण
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंठा