
दैनिक चालु वार्ता उमरी प्रतिनिधी- श्रीनिवास मुक्कावार
प्रतिवर्षाप्रमाणे उमरी येथील माॅडर्न इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतिने आषाढी एकादशी निमित्ताने शहरातील प्रमुख रस्त्यावरून दिंडी काढून संताचे विचार समाजापुढे मांडून समाजप्रबोधनाचे काम केले आहे.
श्री. रूक्मिनी पांडुरंगाचे वेषातील चिमुकल्यांनी आणि त्यांचे पाठी मागील संताच्या वेषभुषेतील दिंडीत सहभागी चिमुकल्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
संताच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या उमरी नगरीत सकाळी टाळ, मृदुंगाचे व विठ्ठल नामाचे जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.विविध संतानी समाज उपयोगी दिलेले संदेश चिमुकल्यांनी जनते पर्यंत पोहंचविले.तसेच वारीत खेळल्या जाणार्या वारकर्यांचे विविध खेळांची प्रात्यक्षिके शहरातील चौकाचौकातून विद्यार्थ्यांनी करून दाखविली.सध्याचे परिस्थितीत संताचे सामाजिक विचार आवश्यक असून त्याची जाणीव विद्यार्थ्यांचे मनात बाल वयापासून रूजावेत ह्यासाठी माॅडर्न इंग्लिश स्कूल तर्फे असे उपक्रम राबविण्यात येतात असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा संजय कुलकर्णी यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.