
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : उरळगावचे मा. उपसरपंच रामभाऊ राजराम बांडे ( वय वर्ष ४३ ) यांचे अल्प आजाराने ( ता. ०३ ) दुःखद निधन झाले. मित्रांच्या संकटकाळात तत्परतेने धावून जाणारा मित्र गेल्याने तरुणवर्गांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उरळगांव ग्रामपंचायतचे ते मा.उपसरपंच असताना उरळगावच्या विकासाची भक्कम पायाभरणी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केली.उरळगांवच्या पंचक्रोशीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मोठा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पाठिमागे आई,पत्नी,मुलगा,भाऊ सोमनाथ बांडे, ग्रामपंचायत सदस्य भावजय राणीताई बांडे असा परिवार आहे.