दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
भोर/पुणे : १९७५ मध्ये अंतर्गत आणि बाह्य धोक्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या आणीबाणीच्या काळात भोर तालुक्यातील अनेक सत्याग्रहींनी सक्रीय सहभागी होत वेळप्रसंगी कारावास भोगला. अशा सत्याग्रहींचा आणीबाणी दिनाचे औचित्य साधत नुकतेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनायक ठोंबरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना ठोंबरे म्हणाले, भोर तालुका शूरवीरांचा आहे. आणीबाणीच्या काळातही या तालुक्यातील मधुकर एकनाथ पैठणकर, विजय दत्तात्रय दुसंगे, शिवनाथ पारखी, दिलीप खुर्द, विश्वास गोखले, विश्वास जोशी, विनायक सणस, ज्ञानोबा घोणे, सदाशिव अंबिके, रवी पाटणकर, अशोक काळे यांच्यासारख्या असंख्य समाजसेवकांनी सत्याग्रहात सहभागी होत देशासाठी महान कार्य केले असून त्यांच्या कार्याला सलाम करावा तेव्हढा कमी आहे. आणीबाणी या विषयावर बोलताना त्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या झालेल्या हत्येची सविस्तर मांडणी केली. लोकशाही सदृढ करण्यासाठी पुन्हा आणीबाणी लागू होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र कंक, मुळशीचे अध्यक्ष समीर मारणे, उत्तरचे अध्यक्ष संतोष धावले, माजी उपाध्यक्ष समीर घोडेकर, माजी अध्यक्ष युवामोर्चा अमर बुदगुडे, उद्योजक रमेश विदगुडे, सूरज चव्हाण, राजेश कुडले, सुशांत लोखंडे, नवनाथ डाळ, गणपत गाडे, महादेव बुदगुडे, भाजप भोर विधानसभेचे विस्तारक दीपक रजपूत शहराध्यक्ष पल्लवी फडणीस , माजी शहराध्यक्ष राजेंद्र गुरव, संतोष लोहकरे, दत्तात्रय झाजले, अनिरुद्ध धाराशिवरकर, संजय खरमरे, अमर ओसवाल , अप्पा जोशी, बादशाह शेख, मंदार पैठणकर , माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर, जगदीश किरवे, गणेश पवार, सचिन हरणसकर, यशवंत तारू आदीसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
